TOD Marathi

मुंबई : अनेक पोलिस ठाण्यांमध्ये  दाखल करून घेण्यात आलेले सर्व एफआयआर बेकायदा आहेत आणि माझ्यावर झालेली अटक कारवाईही बेकायदा आहे, असं अभिनेत्री केतकी चितळेचं म्हणणं आहे.  इतकंच नव्हे तर व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्याची विनंतीही केतकीनं याचिकेद्वारे केली आहे. ( Ketaki Chitale FIR for controversial post on sharad pawar )

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयीची आक्षेपार्ह कविता सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल कळवा पोलिस ठाण्यासह राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यांत केतकीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले होते. गेल्या 23 दिवसांपासून अटकेत असलेली अभिनेत्री केतकी  हिनं आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ( Ketaki Chitale In Highcourt )

दरम्यान  केतकीच्या या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी हायकोर्टाला मंगळवारी (7 जून) अर्जाद्वारे विनंती करणार असल्याची माहिती अॅड. घनश्याम उपाध्याय यांनी दिली. 14 मे रोजी कळवा पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर 15 मे रोजी केतकीला अटक झाली. ठाणे न्यायदंडाधिकारी कोर्टाने केतकीला 18 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. (Ketaki chitale in custody)