TOD Marathi

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे आपल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी नेहमीच चर्चेत असते. अशातच आता तीनं फेसबुकवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहीली आहे.  तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, अशा शब्दात तीनं पवारांवर टीका केली आहे.

केतकी चितळेनं पोस्टमध्ये नक्की काय म्हटलंय?

तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा
ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक
सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे
समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप
ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर
भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा
खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड
याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड

केतकी चितळेच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर तीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. शरद पवारांनी कवी जवाहर राठोड कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडणारी कविता साताऱ्याच्या भाषणात म्हटली होती. कवितेत पवारांनी हिंदू देवतांचे बाप काढल्याची टीका भाजपनं केली होती. याच कवितेचा धागा पकडून केतकीनं आता पवारांवर टीका केली आहे.

दरम्यान याप्रकरणी केतकीविरोधात कळव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.