TOD Marathi

गांधीनगर :  गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून अंमली पदार्थ जप्त करण्यात एटीएसला यश आलं आहे.  जिल्ह्यातील किनारी भागात  खाडीतून जप्त केलेल्या बॅगमध्ये तब्बल 250 कोटी रुपयांचं हेरॉइन सापडलं आहे. विशेष म्हणजे हे  हेरॉईन पाकिस्तान तस्करांकडून फेकण्यात आलं असल्याचं एटीएसनं यावेळेस सांगितलं आहे. सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांनी रविवारी  49 बॅग जप्त केल्या होत्या. यापूर्वीच 30 मे रोजी तटरक्षक दल आणि एटीएसनं अरबी समुद्रातून भारतीय सीमेअंतर्गत सात पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. ( Gujarat ats seizes heroin worth 250 crore )

गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक बी. पी. रोझिया यांनी यावेळेस सांगितलं की, ‘गुजरातमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करण्याच्या योजना आखत असलेल्या तस्करांसंबंधित मिळालेच्या सूचनेवरून, बोटीचा कॅप्टन मोहम्मद अक्रम याने तटरक्षक दलाचे जहाज जवळ येत असल्याचे पाहून दोन पिशव्या समुद्रात फेकून दिल्या. ( Gujrat Drugs Seizes by ATS )

तटरक्षक दल आणि एटीएसने 30 मे रोजी अल नोमान या पाकिस्तानी बोटीला सात जणांसह पकडलं होतं. रोजिया यांनी सांगितलं की, फॉरेन्सिक विश्लेषणातून ( Forensic Analysis ) असे दिसून आले आहे की, 49 बॅगमध्ये सुमारे 50 किलो हेरॉईन होतं. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 250 कोटी रुपये आहे.’ (International Market Heroin Price )