TOD Marathi

कर्लस मराठीवरील जीव माझा गुंतला ( jeev majha guntala latest update) या मालिकेतील अंतरा आणि मल्हाराची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. अंतराची यंदाची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. यासाठी ती खास तयार झाली आहे. याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

 

राजश्री मराठीनं अतंराच्या पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. यामध्ये अंतरा पारंपरिक नऊवारीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. हिरव्या रंगाची नऊवारी तिला अतिशय शोभून दिसत आहे. पारंपरिक दागिने, नाकातील नथ आणि केसातील गजरा तिच्या सुंदरतेत जरा जास्तच भर टाकत आहे. प्रेक्षक देखील वटपौर्णिमेचा भाग पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहेत. अंतरा तिच्या पहिल्या वटपौर्णिमेला मस्त झोपळ्यावर झुलताना दिसत आहे. अतंराचं प्रेम मल्हारला कधी कळणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अंतरानं मल्हारसाठी उपवास धरला आहे मात्र यावर मल्हारची कशी प्रतिक्रिया असणार हे पाहणं देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

जीव माझा गुंतला मालिकेच्या सेटवरील सर्व कलाकार कायमच मस्ती करत असतात. अंतरा मल्हार यांच्यासोबत चित्रा देखील खूप मस्ती करत असते. त्यांचे अनेक धमाकेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात.