TOD Marathi

नवी दिल्ली :  ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन देशभरात चांगलाच वादंग पहायला मिळाला. १९९० मध्ये कश्मीरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली  परिस्थिती यावर चित्रपटाचं कथानक भाष्य करत होतं. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला. पण प्रेक्षकांनी मात्र चित्रपटाकडे पाठ न फिरवता ‘द कश्मीर फाइल्स’ला उत्तम प्रतिसाद दिला. ( The Kashmir Files Sequel coming soon  )

विशेष म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) या चित्रपटाचा सीक्वेल घेऊन येणार असल्याचं आता त्यांनी जाहीर केलं आहे. विवेक यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या सीक्वेलची माहिती देताना ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

विवेक यांनी  पोस्टमध्ये म्हटलंय की, खूप साऱ्या दहशतवादी संघटना,पाकिस्तानी लोक,कॉंग्रेस,आम आदमी पार्टी आणि आता शिवसेना तसंच अर्बन नक्षलवादी देखील मला ‘द काश्मिर फाईल्स २’ संदर्भात विचारत आहेत. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की मी कुणालाच निराश करणार नाही. फक्त तुम्ही आपली इम्युनिटी वाढवायला सुरुवात करा. विवेकचं हे ट्वीट सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतं आहे. ( Vivek Agnihotri Viral Tweet )