TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 20 मे 2021 – प्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. आज (गुरुवार, 20 मे 2021) सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मागील काही दिवसांपासून कोलकत्तामधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अरिजितच्या आईला रक्ताची गरज होती, अशी पोस्ट काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने सोशल मीडियावर लिहिली होती.

‘अरिजित सिंगच्या आईसाठी A- या रक्ताची खूप आवश्यकता असून त्यांना अम्री ढाकुरियामध्ये दाखल केलं आहे. त्यांना आज तातडीने रक्ताची गरज आहे’, अशी पोस्ट अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने लिहिली होती.

स्वस्तिकाच्या या पोस्टवर अनेकांनी मदत करण्याची इच्छा व्यक्ती केली. तसेच तिच्याकडून संपर्क क्रमांक मागितला होता. मात्र, अरिजितच्या आईच्या प्रकृतीविषयी फारशी माहिती मिळाली नाही.