TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 20 मे 2021 – भारत देशात सुमारे 28 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. सध्या काही राज्यातील निवडणुका झाल्या असून तेथे मुख्यमंत्री यांनी देखील शपथ घेतलेली आहे. दक्षिणेकडील केरळ या छोट्या राज्यात दुसऱ्या वेळी सत्तेवर आलेले पी. विजयन नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. आपण जाऊन घेऊया कि, राज्यातील मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?, तर हे प्रत्येक राज्यावर अवलंबून आहे. प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पगार यात तफावत आढळत आहे. तरीही केरळ मुख्यमंत्र्यांना प्रतिमहिना 1 लाख 85 हजार पगार मिळतो. त्यात बेसिक पे, डियरनेस अलाउंस, घर भाडे आदींचा समावेश आहे.

केरळचे विजयन याना मिळणारा पगार 18 राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी आहे. देशात सर्वाधिक पगार घेणारे मुख्यमंत्री तेलंगानाचे असून त्यांना दरमहा 4 लाख 10 हजार पगार मिळतो. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा नंबर असून त्यांना 4 लाख रुपये पगार मिळतो.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पगार प्रतिमाह ३ लाख ६५ हजार आहे तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दरमहा ३ लाख २१ हजार रुपये वेतन मिळते. तर यापेक्षा कमी पगार मिझोरम, राजस्थान, उत्तराखंड, ओरिसा, बंगाल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो.

सर्वात कमी पगार नागालँड राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो. त्यांना दरमहा १ लाख १० हजार पगार आहे. तर पुडुचेरीच्या मुख्यमंत्र्यांना १ लाख २० हजार, बंगालच्या मुख्यमंत्र्यांना १ लाख १७ हजार, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना २ लाख, गोवाच्या मुख्यमंत्र्यांना २ लाख २० हजार, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना ३ लाख २१ हजार, राजस्थान आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना १ लाख ७५ हजार, ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांना १ लाख ६५ हजार, मेघालयच्या मुख्यमंत्र्यांना १ लाख ५० हजार, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना २ लाख ९० हजार तर आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना ३ लाख ३५ हजार दरमहा पगार मिळतो.