TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 25 जून 2021 – कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता आवश्यक ती सर्व तयारी केली जात आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी गुरुवारी आपल्या सरकारी निवास्थानाबद्दल माहिती देत इथं कोविड सेंटर केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तीरथ सिंह रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रावत म्हणाले, राज्यात आता कोविड रुग्णालयांची संख्या देखील वाढविली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवेळी उभी केलेली रुग्णालये देखील आहेत. त्याबरोबरच नवी रुग्णालये जोडली जाणार आहेत.

डीआरडीओच्या मदतीने ऋषिकेश आणि हल्द्वानी दोन जागांवर 500-500 बेडची व्यवस्था असलेली रुग्णालयं उभारली जाणार आहेत. तसेच काही बड्या हॉटेल्सना देखील कोविड सेंटर बनविण्याचा विचार आहे.

रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्याचे आव्हान असताना तत्काळ उपचार उपलब्ध करून देणे ही सरकारची प्राथमिकता आहे. दुसऱ्या लाटेत भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. हे लक्षात घेता पुढील तयारी करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. कोरोना बाबत उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर उत्तराखंड सरकारने आपण करत असलेली तयारी पत्रकारांसमोर मांडली.