दूध दराबाबत लवकर कायदा तयार करणार – Sunil Kedar, कोरोनाचा शेतकऱ्यांना फटका

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 जून 2021 – दुधाला योग्य दर मिळण्याकरीता लवकर कायदा तयार करणार आहे, असे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुधाचे दर कमी झाल्याने संकट कोसळलं होतं. राज्यातील विविध संघटनांनी दूधदर वाढविण्यात यावा म्हणून आंदोलन केलं होतं. याची दाखल सरकारने घेतली आहे, असे समजत आहे.

दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी संघटना, विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्यानंतर दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केलं होतं. या बैठकीनंतर पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार आहे. दुधाच्या दराच्या संदर्भात आज वेगवेगळ्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली.

ऊसाप्रमाणे दुधाला एफआरपीप्रमाणेच भाव मिळावा, यासाठी कायदा करण्याचे ठरलं आहे. त्यासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येईल. जेणेकरून दूध उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसणार नाही.

Please follow and like us: