टिओडी मराठी, दिल्ली, दि. 25 जून 2021 – काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना वाहन चालवण्यासाठी दोषी ठरवत त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलीय. वढेरा हे सुरक्षारक्षाकांच्या ताफ्यासहीत बारापुला येथून सुखदेव येथील आपल्या कार्यालयात जात असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे वाहन बारापुला पुलावरून जात असताना अचानक ब्रेक लावला. यावेळी मागील सुरक्षारक्षाकांच्या वाहनाला धडक दिलीय. यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना बेजबाबदारपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवण्याच्या कायद्याअंतर्गत दंड करत पावती फाडली.
या प्रकरणात वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना बेजबाबदारपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालविण्याच्या नियमांअंतर्गत १८४ मोटर वाहन कायद्याअंतर्गत म्हणजेच धोकादायक वाहन चालविणेसाठी दंड करत पावती फाडली.
The vehicle of Robert Vadra was challaned under Section 184 of The Motor Vehicles Act (Dangerous driving). Vadra was going to his office on Wednesday morning with his security personnel. Suddenly his car was hit from behind after it decelerated: Delhi Police
— ANI (@ANI) June 24, 2021