TOD Marathi

सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका! दूधाच्या दरात वाढ

मुंबई : ‘अमूल’ आणि मदर डेरीने (Amul and Mother Dairy) दुधाच्या दरात वाढ केली. त्यामुळे सर्वसामान्य जनता महागाईने आधीच होरपळली असतानाच आता पुन्हा एकदा नागरिकांना झटका बसणार आहे. (Amul Milk Price)

अमूल या नावाने दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग कंपनीने आपल्या दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली. ही वाढ 17 ऑगस्टपासून लागू होणार आहे.

ही दरवाढ झाल्यानंतर ग्राहकांना आता अमूल कंपनीच्या दूधाच्या प्रत्येक लिटरवर 2 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याची झळ बसणार असून त्यांचे आर्थिक बजेट बिघडणार आहे.

नव्या किमतींनुसार, अमूल शक्ती दूध आता 50 रुपये प्रति लिटर, अमूल गोल्ड आता 62 रुपये प्रति लिटर आणि अमूल ताजा 56 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे.