TOD Marathi

मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या Actress Payal Rohatgi ला ठोकल्या बेड्या ; Ahmedabad पोलिसांची कारवाई

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 जून 2021 – बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहत असे. अगदी राजकीय घडामोडिंपासून बॉलिवूडमधील घराणेशाहीपर्यंत विविध विषयांवर ती मतं मांडते. मात्र, यामुळं अनेकदा ती वादात आली. असाच काहीसा प्रकार पुन्हा घडला. यावेळी शेजाऱ्यांच्या मुलांना हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पायलने राहत्या सोसायटीमधील रहिवास्यांना अश्लील भाषेत धमक्या दिल्या. त्यांना खोट्या आरोपांखाली तुरुंगामध्ये डांबण्याची धमकी दिली.

याशिवाय सोसायटीच्या आवारात जी मुलं खेळताना दिसतील त्यांचे हात पाय तोडेन, असे ती म्हणाली. असे आरोप तिच्यावर केले आहेत. या आरोपांखाली अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केलीय. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

याअगोदर राजस्थान पोलिसांनी पायलला अटक केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविषयीचा एक व्हिडीओ पायलने तयार केला होता.

या व्हिडीओत तिनं नेहरुंवर खोटे आरोप केले होते. या प्रकरणातून अद्याप तिची पूर्णत: सुटका झालेली नाही.