काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सोबत खंबीर उभा, काँग्रेस नेते कमलनाथ म्हणतात…

काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सोबत खंबीरपणे उभा आहे. माझं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. (CM Uddhav Thackeray tested Covid positive) मी उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार होतो मात्र उद्धव ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे मी त्यांच्याशी फोनवरून बोललो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने निरीक्षक म्हणून पाठवलेले कमलनाथ यांनी व्यक्त केली. (Kamal Nath says Congress with Mahavikas Aghadi)

काँग्रेस नेते कमलनाथ यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी सोबत आहेत. काँग्रेस पक्षाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे महाविकास आघाडीला पाठिंबा आहे, अशी चर्चा आमच्यात झाली. असंही कमलनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. (Kamal Nath met Sharad Pawar)

सरकार स्थिर आहे, सरकार बरखास्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आणि महाविकास आघाडीचा कुठलाही विचार नाही. या पेचप्रसंगातून मार्ग निघेल असंही वक्तव्य कमलनाथ यांनी केलं. (MVA government is stable)

दरम्यान काँग्रेस नेते कमल नाथ यांनी काँग्रेस आमदारांची देखील बैठक घेतली या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सर्व मंत्री आणि आमदारही उपस्थित होते.

Please follow and like us: