TOD Marathi

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना कशा पद्धतीने फसवून नेलं, याची माहिती आता समोर येतीय. काल उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी आपली सुटका कशा पद्धतीने झाली, याचा थरारक अनुभव मुख्यमंत्र्यांसमोर कथन केला. आज अकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन पाटील यांनी तर मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. मला हार्टअटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. (I didn’t have heart attack, says MLA Nitin Deshmukh) मला रुग्णालयात नेल्यानंतर २०-२५ लोकांनी मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले, असं नितीन देशमुख यांनी सांगितलं.

माझा रक्तदाबही वाढला नव्हता. मला हार्टअटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन काय होतं हेही मला माहिती नाही. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आता मी माझ्या घरी जात आहे. मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून निघालो. रस्त्यावर तीन वाजता उभा होता. पण माझ्यापाठी २०० पोलीस होते. कोणतेही वाहन मला लिफ्ट देत नव्हते. त्यानंतर पोलीस मला रुग्णालयात घेऊन गेले आणि मला हार्टअटॅक असल्याचा बनाव रचला, असे नितीन देशमुख यांनी सांगितले. (Nitin Deshmukh says how he faced problem)

मला हार्टअटॅक आलेला नव्हता, मला अटॅक आला हे धादांत खोटं आहे. माझी तब्येत बरी आहे. मी तुमच्यासमोर चांगल्या स्थितीत उभा आहे. काल तिथल्या लोकांनी रुग्णालायत नेलं. तुमच्यावर कारवाई करायची होती. माझा बी.पी. वाढला नव्हता. रुग्णालयात नेल्यावर माझ्या दंडामध्ये चुकीच्या पद्धतीनं इंजेक्शन टोचण्यात आले. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे आमचे मंत्री आहेत पण मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. हार्ट अटॅकचं कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं असल्याचं नितीन देशमुख म्हणाले. (I spoke with Uddhav Thackeray, says Nitin Deshmukh)