TOD Marathi

शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांना हॉटेल सेंट रेजीसमधून काल घरी जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. (Deepak Kesarkar spoke on present politics) शिवसैनिकांनी त्यांना अडवल्यानं ते संतप्त झाले होते. शिवसेनेनं भाजपसोबत जायला हवी, अशी भूमिका फार पूर्वीपासून मी घेतली होती, असं आमदार दीपक केसरकर म्हणाले.

काल मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उशिरापर्यंत होतो. मी माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडली. माझी पत्नी घरी एकटी असल्यानं मी घरी जाणार असल्याचं सांगितलं. मी आदित्य ठाकरे यांच्यासोबत होतो, हॉटेल सेंट रेजीसमध्ये मी आपलं घर सावरलं पाहिजे, असंही सांगितलं. शिवसेना आणि भाजपनं एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका मी यापूर्वी देखील मांडली आहे. (Earlier I suggested to go with Shivsena, says Shivsena MLA Dipak Kesarkar) शिवसैनिकांनी मला अडवल्यानंतर मी अशी गोष्ट सहन करणार नसल्याचं सांगितलं, असंही दीपक केसरकर म्हणाले.

शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात दुसऱ्या स्थानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती. त्यामुळं त्यांना बळ देणं आवश्यक आहे. (Shivsena MLA needs power) उद्धव ठाकरे यांना आम्ही हे वारंवार सागंत होतो. यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे अडचणी मांडल्या आणि आमदार त्यांच्यासोबत गेले. तुमच्यासोबत राहण्याची इच्छा असलेल्या आमदारावर तुम्ही ही वेळ का आणत आहात? आमच्या सारख्या नेत्यांचा शिवसेनेत मान ठेवला पाहिजे, असंही दीपक केसरकर म्हणाले.

महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं आदित्य साहेबांची बदनामी करण्यात येत होती. आदित्य ठाकरेंची बदनामी करणाऱ्या नेत्याला स्टेजवर बसवण्यात आलं. उद्धव ठाकरेंना कुटुंबाची बदनामी भाजपकडून होते की काय त्यांना वाटत असावं. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचं बाँडिंग जुनं आहे. उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा इतका मी मोठा नाही, असं दीपक केसरकर म्हणाले. (I can’t advice CM Uddhav Thackeray, says Kesarkar)