TOD Marathi

दुपारी एक वाजता म्हणजे अवघ्या काही मिनिटात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार बरखास्तीवर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र मंत्रिमंडळ बैठकीला केवळ दहा मिनिटे शिल्लक असताना बैठकीचा अजेंडा मात्र अजूनही ठरलेला नाही. (Maharashtra cabinet meeting today)

मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री एकनाथ शिंदे नसणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही मंत्रीमंडळाची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. (Ekanath Shinde won’t be present in Cabinet meeting)

काँग्रेसने या पार्श्वभूमीवर निरीक्षक म्हणून पाठवलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे मुंबईत (Kamal Nath in Mumbai) दाखल झाले आहेत. दिवसभरात ते काँग्रेसच्या सर्व आमदारांसह अन्य नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. शरद पवार यांच्याशीही ते भेटणार आहेत. सरकार पडणार नाही सरकार बरखास्त होणार नाही अशा पद्धतीची माहिती सर्व नेत्यांच्या वतीने दिली जात आहे.