TOD Marathi

सध्या इंटरनेट वर फिरत असलेला ऑप्टिकल इल्युजन च हा फोटो तुम्ही पाहिलात का? या फोटोमध्ये लपलेले आकडे शोधण्यासाठी नेटीझन्समध्ये खूप क्रेझ दिसून येत आहे. नेमक काय आहे ह्या फोटो मध्ये आणि काय आहे ऑप्टिकल इल्युजन जाणून घेऊया ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून..
ऑप्टिकल इल्यूशन असलेले अनेक फोटो तुम्ही सोशल मीडिया वर व्हायरल होताना नक्कीच बघितले असाल. ऑप्टिकल इल्यूशनलाच दृश्य भ्रम किंवा डोळ्यांची केली जाणारी फसवणूक अस देखील आपण म्हणून शकतो. भरपूर ऑप्टिकल इल्यूशन चे फोटोज् असे असतात की ज्याचे रहस्य सोडवताना युजर्स ला अगदी वेड लागते आणि त्यात ते एवढे गुंतून जातात की त्या ऑप्टिकल इल्युजनचे गूढ उकलण्यासाठी अनेक वेळ ते त्या मोबाईल मधेच घालवतात .महत्त्वाचं म्हणजे ते गूढ सोडवायचे असेल तर त्या दृश्य भ्रमाकडे २-३ वेळा पहावे लागते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्याचं उत्तर शोधण्याचा नेटीझन्स खूप प्रयत्न करत आहेत.

तस बघायला गेलं तर या फोटोमध्ये काही आकडे दडलेले आहेत. ते आकडे कोणते आहेत याच शोधकार्य नेटकर्यांकडून सुरु आहे. आणि त्या फोटो वर अनेक कॉमेंट्स करून कुणी एक आकडे सांगतंय तर, कुणी काहीतरी भलतेच आकडे सांगतंय. दिलेल्या फोटोत आपण बघू शकतो की एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळात काही संख्या लिहिलेल्या आहेत.वर्तुळात लपलेला खरा क्रमांक फार कमी लोकांना सांगता आला आहे, तर बहुतांश लोकांनी चुकीचा क्रमांक सांगितला आहे.

हे लक्षवेधीत करून घेणारे छायाचित्र @benonwine या आयडी नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे आणि त्यावर तुम्हाला काही नंबर दिसतो का?असा प्रश्न विचारला जात आहे .जर तो आकडा दिसत असेल तर सांगा तो नंबर कोणता आहे? या व्हायरल फोटोला आतापर्यंत २.३ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर ११ हजाराहून अधिक लोकांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक ट्विटर युजर्सनी हा फोटो पाहून त्या सर्कल मध्ये लपलेला नंबर सांगण्याचा प्रयत्न केला आहे.त्यानंतर एका यूजरने त्यावर कमेंट करून ३४५२८३९ हा नंबर सांगितला आहे तर, दुसऱ्या यूजरने ५२८ असा नंबर दिला आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या युजरने ४५२८३ हा क्रमांक दिला आहे.

तर ह्या ऑप्टिकल इल्युजनच खर उत्तर हे आहे..
त्या व्हायरल होणाऱ्या फोटो मध्ये ३४५२८३९ हा नंबर वर्तुळात लपलेला आहे आणि फक्त २-३ वापरकर्ते हा अचूक नंबर सांगू शकले आहेत. चला तर तुम्ही देखील प्रयत्न करून पाहा आणि तुम्हाला कोणते नंबर दिसतोय ते सांगा!