TOD Marathi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी टीव्हीवर लाईव्ह कार्यक्रमात चर्चा करण्यास मी तयार आहे असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी केलं होत. आता त्यावर काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी ट्विट करत भारतीय वृत्तवाहिन्या व वृत्तनिवेदकांवरच टीका केली आहे.

रशियात (Russia)झालेल्या एका सरकारी टीव्हीच्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले होते की भारत (India) आणि पाकिस्तानमधील जे काही मतभेद आहेत ते मिटवण्यासाठी मोदींनी आपल्यासोबत टीव्हीवर चर्चा करावी . आणि इम्रान खान यांच्या ह्याच आवाहनला शशी थरूर यांनी ट्विट करून उत्तर दिलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी भारतीय वृत्तवाहिन्यांनावर चांगलीच टीका केली आहे.
थरूर यांनी ट्विटमध्ये अस म्हणाले आहे की, प्रिय इम्रान खान, युध्दापेक्षा चर्चेतून मार्ग निघाल्यास चांगलेच आहे. पण भारतीय वाहिन्यांवरील चर्चेतून कोणताच मुद्दा सुटलेला नाही. उलट तो अधिकच भडकला आहे. आणि आमच्याच काही वृत्तनिवेदकांना त्यांच्या चॅनल चा टीआरपी वाढणार असेल तर तिसरं महायुध्दही पेटवण्यात आनंद वाटेल, असा टोला शरूर यांनी लगावला आहे.

त्या मुलाखतीत इम्रान खान नेमके काय म्हणाले होते?

मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना इम्रान खान म्हणाले होते की , भारत आणि पाकिस्तानमधील जे काही मतभेद असतील ते चर्चेतून सोडवले जाऊ शकतात. दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी ही हिताची गोष्ट असेल. माझा पक्ष तहरीक ए इंसाफ २०१८ मध्ये सत्तेत आला त्यावेळी भारताशी तात्काळ संपर्क केला होता. काश्मीर प्रश्न भारतीय नेतृत्वाशी चर्चा करून मिटवण्याबाबत चर्चा केली गेली, पण त्यावर भारताकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याचं खान यांनी या मुलाखतीत सांगितले. आणि 6
पुढे ते असही म्हणाली की मी नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीव्हीवर चर्चा करण्यास तयार आहे असं एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी स्पष्ट केलं होत.