TOD Marathi

निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना बीडमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बीड नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर असताना क्षीरसागर बंधूंमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

बीड नगर परिषदेचा निधी पळवून आमदार संदिप क्षीरसागर विकास कामांचं उद्घाटन करत असल्याचा आरोप नगरसेवक डाॅक्टर योगेश क्षीरसागर यांनी केला होता. यावरुन देखील बीडमध्ये चांगलेच वातावरण तापले होते.

४ दिवसांपूर्वी एका सभेत आमदार संदिप क्षीरसागर यांनी पुष्पा चित्रपटातील ‘झुकेगा नही साला’ हा डायलॉग मारुन सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले होते. यानंतर दोनच दिवसात नगरसेवक डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम प्रसंगी मै हु डॉन गाणे म्हणत आमदारांना रोकठोक प्रतिउत्तर दिले असल्याची चर्चा सध्या बीड मध्ये रंगली आहे.

यामध्ये पुष्पा ला सांगा डॉन आलाय अशा आशयाचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर खूप वायरल होत आहेत.
आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रत्येक प्रश्नाला नगरसेवक डॉक्टर योगेश क्षीरसागर हे सडेतोड उत्तर देत आहेत.