नवी दिल्ली: पुढील काही दिवसांत एलपीजी सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. ग्राहकांना एलपीजी सिलेंडरसाठी १००० रुपये मोजावे लागू शकतात. इतकंच नाही तर सरकार एलपीजी सिलेंडरवर मिळणारं अनुदानही रद्द करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना या महागाईच्या काळात आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने केलेल्या अंतर्गत मूल्यांकनात ग्राहक एलपीजी सिलेंडरसाठी १००० पर्यंत पैसे मोजण्यास तयार असल्याचं समोर आलं आहे. मात्र यावर अद्याप केंद्र सरकारकडून यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये. गेल्या वर्षभरात एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढतच असल्याचे दिसत आहे.
सरकार सध्याच्या योजनेत कोणतेही बदल करणार नाही किंवा उज्ज्वला योजनेंतर्गत आर्थिकदृष्या सक्षम नसणाऱ्या ग्राहकांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही स्पष्टता नाही.