मुंबई: छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम ‘द कपील शर्मा शो’ हा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा शो आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये काही कलाकार दारू पिऊन अभिनय करत असल्याचे समोर आले आहे. यावरून या शोविरोधात एफआरआय दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवपुरीच्या वकिलांनी सीजेएम कोर्टात एफआयआर दाखल केली आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार, सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘द कपिल शर्मा शो’ खूपच ढिसाळ आहे. शोमध्ये मुलींवर देखील अश्लील कमेन्ट करण्यात येतात. एक वेळा शोमध्ये बेकायदा कोर्ट तयार करण्यात आलं आणि त्याठिकाणी काही कलाकारांनी दारू पिऊन अभिनय केला. हा कायदा आणि न्यायालयाचा अवमान आहे, असं यात म्हणलं आहे.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता ‘द कपील शर्मा शो’मध्ये कपिलच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. यावर आता पुढे काय कारवाई केली जाणार याकडे आता लक्ष वेधले आहे.