टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 जून 2021 – करोनाचा नवा व्हेरियंट डोकेदुखी ठरणार आहे. करोनाचे डेल्टा व्हेरियंट आले असून हे सर्वाधिक घातक व्हेरियंट आहे, असे समोर येत आहे. त्यामुळे या व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी आयसीएमआरकडून सूचना दिल्या आहेत.
भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता काही प्रमाणात दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे अनेक शहरांत अनलॉकची प्रक्रिया सुरू झालीय. त्याचवेळी खबरदारी म्हणून करोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे.
करोनाच्या डेल्टा व्हेरियंटकडे दुर्लक्ष करू नये. 28 प्रयोगशाळांत या व्हेरिएंटवर संशोधन सुरूय. हे व्हेरियंट किती धोकादायक आहे? यावर शोध सुरुय. मात्र, या व्हेरियंटचे रुग्ण कमी आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नये, असे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे.
बचावासाठी लसीकरण गरजेचे :
या दरम्यान करोनाच्या डेल्टा व्हेरियंटवर मात करण्यासाठीचे शस्त्र नाही. मात्र, करोना नियम पाळल्यास यापासून बचाव होऊ शकतो, असे डॉक्टर विनोद कुमार पॉल यांनी म्हटलंय.
या नव्या व्हेरियंटला रोखायचं असेल तर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग आणि कंटेन्मेंट झोन तयार करणे, तसेच लसीकरण गरजेचे आहे, असे देखील आयसीएमआरने म्हटलंय.