Actor रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा रामराम ; Rajini Makkal Mandram पक्ष करणार विसर्जित

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 जुलै 2021 – सुपरस्टार रजनीकांत आता राजकारणाला कायमचा रामराम केला असून त्यासह रजनी मक्कल मंद्रम हा त्यांचा पक्ष विसर्जित करणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. सोबतच ‘भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीही योजना नाही’, असेही रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे.

याविषय़ी अभिनेते रजनीकांत म्हणाले की, रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जिक करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केलाय.

भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही. रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होणार आहे. त्याचे ‘रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’मध्ये रुपांतर केले जाईल.

राजकीय प्रवेशावरील अनेक प्रश्नांबाबत त्यात चर्चा केली जाणार आहे. ‘मी राजकारणात प्रवेश करावा की नाही? यावर आम्ही चर्चा करू.

कोविड, निवडणुका, शूटिंग आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे मी याअगोदर कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो, असे रंजनीकांत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे.

Please follow and like us: