TOD Marathi

टिओडी मराठी, अकोला, दि. 12 जुलै 2021 – राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांना काल दुपारी हिंगणा इथे पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. अमोल मिटकरी यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्वतः मिटकरी यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी सांस्कृतिक व चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा अकोला दौरा होता. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बीफॉर्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता.

अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन करत होते. भाषणाच्या शेवटी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकड राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली’ ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केली.

त्याचवेळी त्यांचा आवाज चिरका होऊ लागला, तोंड किंचित वाकडे होऊ लागले, याची जाणीव उपस्थित काहींना होताच तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.

… भेटायला येऊ नका :
अमोल मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. चिंता करण्यासारखे काही नाही, असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येवू नये, अशी विनंती अमोल मिटकरी यांनी कार्यकर्ते आणि मित्रांना केली आहे

शिवव्याख्याते म्हणून अमोल मिटकरी यांची ओळख :
अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील आहेत. अकोल्याच्या अमरावती सीमेवर असलेल्या कुटासा हे त्यांचे गाव. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती व किराणा दुकान होते.

मात्र, त्यांच्या वडिलांना समाजसेवेची आवड. त्यांच्या कुटुंबावर गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रभाव होता. समाजसेवेचा हा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. मिटकरींना लहानपणापासून भज किर्तन यात रस आहे.