टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 ऑगस्ट 2021 – आज ७५ व्या स्वातंत्र्यदिन देशात उत्साहात साजरा होत आहे. देशात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करून स्वातंत्र्याला आणि आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जातेय. यंदाही पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना अनेक गोष्टींवर भूमिका मांडली. यात करोनापासून देशातील क्रीडा, उद्योग क्षेत्र याविषयी त्यांनी मत मांडलं. स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
मोदी म्हणाले, देशासाठी ही गर्वाची बाब आहे की शिक्षा असो वा खेळ.. बोर्डाचे निकाल असो वा ऑलिम्पिकचं मैदान, आपल्या मुली आज अभूतपूर्व कामगिरी करत आहे. भारताच्या मुली आपली जागा घेण्यासाठी आतूर आहेत. आपल्याला हे निश्चित करावं लागणार आहे, की प्रत्येक क्षेत्रात महिलांचा समान सहभाग असेल.
रस्त्यापासून कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षिततेची भावना व्हावी, सन्मानाची भावना व्हावी, असे ठरवायचं आहे. त्यामुळे देशातील सरकारला, प्रशासनाला आणि नागरिकांना आपली १०० टक्के जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. हा आपल्याला स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा संकल्प बनवावा लागणार आहे. मी आज हा आनंद देशवासीयांसोबत साजरा करत आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
देशात सर्वच क्षेत्रांत महिला पुरुषांच्या बरोबरीने दिसत आहेत. सेनेमध्ये मात्र हे प्रमाण कमी आहे. या पार्श्वभूमीवर लष्करामध्ये आपलं भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या मुलींसाठी मोदींनी मोठी घोषणा केलीय. देशातील सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश सुरू करण्याचा निर्णय सरकारने यावेळी जाहीर केला आहे.
मला लाखो मुलींचे संदेश मिळायचे की, त्याहि सैनिक शाळांमध्ये शिकू इच्छितात. त्यांच्यासाठी सैनिक शाळांचे दरवाजे उघडले पाहिजेत. दोन-अडीच वर्षांपूर्वी मिझोरामच्या सैनिकी शाळांत पहिल्यांदा आम्ही मुलींना प्रवेश देण्याचा छोटासा प्रयोग आम्ही सुरू केला होता.
आता सरकारने ठरवलं आहे की, देशातल्या सैनिकी शाळा देशातील मुलींसाठी देखील उघडल्या जातील. देशातल्या सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुली देखील शिकतील, असे नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलंय.
It's a major turning point for our country. In this decade we've to further speed up drive to bring in talent, technology& professionalism in sports in the country. It's a matter of pride that India's daughters are giving a splendid performance, be it Boards exams or Olympics: PM pic.twitter.com/2ERMEdLIBl
— ANI (@ANI) August 15, 2021
Addressing the nation from the Red Fort. Watch. https://t.co/wEX5viCIVs
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2021