TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 14 ऑगस्ट 2021 – राजकारणी लोक हे थापा मारत असतात. आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचे उत्पादन घेतोय. हे काही सोपे काम नाही. यात कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केलीय. आम्ही महिन्याला 10 कोटीप्रमाणे वर्षाला 110 ते 120 कोटी डोसचे उत्पादन जगातली कुठलीही कंपनी इतके उत्पादन करू शकत नाही, असे म्हणत राजकारणी लोकांनी अशी थापेबाजी बंद करावी, सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांनी मोदी सरकारला दिला आहे.

डॉ. सायरस पुनावाला यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सप्टेंबरपर्यंत 45 कोटी डोस मिळतील आणि डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी घोषणा मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. मात्र, हे शक्य नाही, असे स्पष्ट मत डॉ. सायरस पुनावाला यांनी व्यक्त केलं आहे.

यावेळी डॉ. पूनावाला म्हणाले, राजकारणी लोक हे थापा मारतात, आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचे उत्पादन घेत आहे. हे काही सोपे काम नाही. यात कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केलीय. आम्ही महिन्याला 10 कोटीप्रमाणे वर्षाला 110 ते 120 कोटी डोसचे उत्पादन होणार आहे. जगातली कुठलीही कंपनी इतके उत्पादन करू शकत नाही.

‘कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा वेगवेगळ्या लसींचे मिक्सिंग दोन डोस घेण्याचा पर्याय चुकीचा आहे, असे पुनावाला म्हणाले. कोरोनाची तिसरी लाट तीव्र नसेल, असे वाटते. सामुदायिक रोग प्रतिकारशक्ती आणि लसीचे संरक्षण असल्याने लाट आली तरी तिची तीव्रता कमी असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

‘लॉकडाऊन लावणे योग्य नाही. सरकारने लॉकडाऊन लावू नये. कोरोना मृत्यूदर खूप कमी आहे. मृत्यू जर वाढत असतील, तरच लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारावा, असा सल्लाही डॉ. पूनावाला यांनी दिलाय.

केंद्र सरकारच्या लस निर्यातबंदीच्या धोरणावर डॉ. पूनावाला यांनी टीका केली. ते म्हणाले, माझा मुलगा म्हणाला होता की, यावर बोलू नका, पण मी बोलणार. केंद्र सरकारने लस निर्यातीवर घातलेली बंदी योग्य नाही. मोदी सरकारने हा निर्णय घेऊन अतिशय वाईट केलं आहे.

निर्यातबंदी उठवली पाहिजे. कारण, अन्य देशांतील नागरिकांनाहि लसीची गरज आहे. सीरम इन्स्टिटय़ूट आजवर जगातील 170 देशांना लस पुरवत आली आहे. पण, निर्यात बंदीमुळे आता गरज असताना आम्ही त्यांना लस पुरवू शकत नाही, असे पुनावाला यांनी सांगितले आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज