TOD Marathi

Independence Day च्या अगोदर ‘इथे’ घडली दुर्घटना ; ध्वज लावताना अपघातात तिघांचा मृत्यू

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 14 ऑगस्ट 2021 – मध्य प्रदेश राज्याच्या ग्वाल्हेरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना घडलीय. महाराजा बाडा इथल्या महानगरपालिका कार्यालयात ध्वज लावताना मोठी दुर्घटना घडली आहे. हायड्रोलिक मशीनवर महापालिकेचे कर्मचारी ध्वज लावण्यासाठी चढत होते. मात्र, मशीन अचानक तुटली. यातील जखमींना तातडीने खाली आणलं. यात तिघांचा मृत्यू झाला असून एकाला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातात महामंडळाचे कर्मचारी मंजर आलम, कुलदीप दंडैतिया आणि विनोद यांचा मृत्यू झाला आहे. तर एक कर्मचारी गंभीर जखमी झालाय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि प्रभारी महापालिका आयुक्त मुकुल गुप्ता घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये नेण्याबरोबरच मृतदेह डेडहाऊसमध्ये नेण्याचे काम सुरू केले.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या एका व्यक्तीने प्रभारी पालिका आयुक्तांच्या कानशिलामध्ये लगावली. यानंतर घटनास्थळी गोंधळ आणखी वाढला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत लगेच जमावाला दूर केलं आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढलं. अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांशी चर्चा केलीय.

जखमीला योग्य उपचार देण्याचे ही निर्देश दिलेत. तसेच याची अधिक चौकशी केली जात आहे. शहरात सर्वत्र 15 ऑगस्टची जोरदार तयारी सुरूय. याच दरम्यान महाराजा बाडा इथल्या महानगरपालिका कार्यालयातही ध्वजारोहणाची तयारी केली जात होती.

त्यासाठी शनिवारी सकाळी अग्निशमन दलाचे हायड्रोलिक मशीन मागवले. इमारतीवर ध्वज लावण्यासाठी काही कामगार या हायड्रोलिक मशीनवर चढले. या दरम्यान अचानक हायड्रॉलिक मशीन तुटले.