TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 16 जुलै 2021 – राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांसाठी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला असून त्यात कोकण विभाग 100 टक्के निकाल लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. यंदा कोरोनामुळे दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या होत्या.

२०२१ च्या निकालात केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याच अधिक प्रमाणात वाढली नाही. तर, टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. यंदा 957 विद्यार्थ्यांना पूर्ण गुण म्हणजे १००% गुण मिळालेत.

महाराष्ट्र बोर्डाने मागील ६ वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. मागील वर्षी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 95.30 टक्के होती. यंदा ही टक्केवारी 99.95 टक्के आहे.

कोरोनामुळे परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेणार होते. परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द केली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ९ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.

शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवले आहेत.

नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान केले आहे.

त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही सुरु केली. आता शुक्रवारी ऑनलाइन जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंट देखील काढता येणार आहे.

असा आहे विभागिय मंडळ निहाय निकाल :
पुणे : ९९.६५
नागपूर :९९.८४
औरंगाबाद :९९.९६
मुंबई :९९.९६
कोल्हापूर :९९.९२
अमरावती :९९.९८
नाशिक : ९९.९६
लातूर :९९.९६
कोकण :१००

दहावी बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या :
विद्यार्थी : ९,०९,९३१
विद्यार्थिंनी : ७,४८,६९३
एकूण : १६,५८,६२४

निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक : result.mh-ssc.ac.in
शाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी : www.mahahsscboard.in

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज