TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यात करोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी ठाकरे सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. अशा अनाथ झालेल्या बालकांना नोकरी आणि शिक्षणामध्ये 1 टक्के आरक्षण दिलं जाणार आहे, अशी घोषणा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री योशमती ठाकूर यांनी केलीय. या निर्णयामुळे अनाथांच्या जीवन प्रकाशमय होईल, असे वाटते.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आला आहे.

करोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी राज्य सरकारने घेतली होती. त्यानंतर आता अनाथ बालकांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना नोकरी आणि शिक्षणामध्ये १ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच राज्यात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारित योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. राज्यात महिलांसाठी ५० हॉस्टेल्स उभारली जाणार आहेत, असेही माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.