TOD Marathi

Yeddyurappa यांच्या CM पदाच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्या ; पोलिसांचा तपास सुरु, येडियुरप्पा यांच्याकडून Tweet द्वारे कुटुंबीयांचं सांत्वन

टिओडी मराठी, बंगळुरू, दि. 27 जुलै 2021 – कर्नाटकमध्ये बीएस येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचे पडसाद राजकरणाऐवजी जनतेवरही उमटल्याचे दिसत आहे. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे चामराजनगरच्या एका युवकाने आत्महत्या केली असल्याचे समजत आहे. रवी असं या युवकाचे नाव आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी युवकाच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. याबाबत येडियुरप्पा यांनीही युवकाच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त केलंय.

येडियुरप्पा यांनी 35 वर्षीय रविच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त केलं आहे. येडियुरप्पा यांनी कुटुंबीयांचं सांत्वन करत कन्नड भाषेत ट्विट केलं आहे.

त्यांनी लिहिलं की, माझ्यासाठी ही बातमी अत्यंत दुःखद आहे. रविने माझ्या राजीनाम्यामुळे आत्महत्या केलीय. राजकारणामध्ये चढउतार येतात. मात्र, म्हणून कोणीही आपलं आयुष्य संपवावं, हे चुकीचं आहे. ज्या परिस्थितीतून सध्या त्याचं कुटुंब जात आहे, त्याची भरपाई करणं शक्य होणार नाही.

सोमवारी येडियुरप्पा यांचा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपला दोन वर्षांता कार्यकाळ पूर्ण केला होता. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, येडियुरप्पा यांनी वय आणि आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे, असे सांगितले होते.

त्याअगोदर त्यांनी दिल्लीमध्ये जात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या बैठकीनंतर येडियुरप्पा मुख्यमंत्री पद सोडतील, असा अंदाज व्यक्त केला होता.

त्यांनी सोमवारी लिहिलं की, गेल्या दोन वर्षात राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली, ही सन्माची बाब आहे. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. लोकांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांचे आभार मानले आहेत.