TOD Marathi

टिओडी मराठी, सांगली, दि. 27 जुलै 2021 – सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील अंकलखोप इथे पुरग्रस्ताची पाहणी करताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील मोटारीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सुखरूप आहेत.

जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. आज कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आपल्या मतदारसंघातील अंकलखोप इथे पूर परिस्थितीची पाहणी करत होते. यावेळी अचानक गावातील एक इसम मोटारीसमोर आडवा आल्याने त्याला वाचविण्याप्रयत्नात ताफ्यातील एका वाहनाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला.

या अपघातात वाहनचालक आणि अन्य एक पोलीस कर्मचारी जखमी झालेत. पोलीस कर्मचाऱ्यांना सांगली इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सुखरूप आहेत, कारण ते दुसऱ्या वाहनात होते.

आता सांगलीकरांची चिंता नव्या संकटाने वाढवलीय. कारण पुरामुळे मगरी नागरी वस्तीत आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील विविध भागांत मगर रस्त्यांवर, घरांच्या छतावर फिरताना दिसत आहे. कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मगरीचे वास्तव आहे.

या महापुराने मगरी बाहेर पडल्यात. अनेक नागरीवस्तीत मगरी आढळून आल्यात. जेथे पाण्यापासून बचाव होईल, त्या ठिकाणी मगरी विसावत आहेत. एका मगरीने घराच्या छतावर वास्तव केलं आहे, असे आढळे आहे. तर, या मगरीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.