अवघे काही तास बाकी असताना मलिक अन् देशमुखांच्या मतदानाच्या आशा मावळल्या…

मुंबई : महाविकास आघाडीला (MahaVikas Aghadi) सरकारला मोठा झटका बसला आहे.  नवाब मलिकांच्या (Nawab Malik) यांच्या नव्या  याचिकेवर सुनावणीस हायकोर्टानं नकार दिलाय. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) मतदान करण्याच्या नवाब मलिकांच्या (Naweab Malik) सर्व आशा मावळल्या आहेत.  मलिकांची याचिका फेटाळल्यामुळे अनिल देशमुखांनाही (Anil Deshmukh) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही.

सकाळीच मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टाकडून कायम ठेवत नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीची परवानगी नाकारली होती. त्यानंतर याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी करत मलिकांनी पुन्हा नव्यानं याचिका केली होती. दुपारच्या सत्रात या याचिकेवर सुनावणी पार पडणार होती.

दरम्यान, याच निकालावर अनिल देशमुखांचं (Anil Deshmukh) मतदानाचं भवितव्य अवलंबून होतं. जर मलिकांना परवानगी मिळाली असती, तर हा निकाल घेऊन अनिल देशमुख अन्य न्यायमूर्तींपुढे दाद मागणार होते. पण नवाब मलिकांनाच परवानगी नाकारण्यात आल्यामुळे आता अनिल देशमुखांनाही मतदान करता येणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे.

 

 

Please follow and like us: