TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 28 मे 2021 – कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी करत पुण्यातील एका विद्यार्थ्याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच सांगा, जीव महत्त्वाचा की परीक्षा?, असा सवाल देखील याद्वारे केला आहे.

कोरोना परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा की परीक्षा?, असा सवाल याचिकेतून केला असून परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होईल, असे याचिकेत म्हंटलं आहे. या याचिकेवर पुढील आठवडय़ामध्ये सुनावणीची शक्यता वर्तविली आहे.

दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करू नये, म्हणून पुण्यातील निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. परंतु कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही तसेच दहावीची परीक्षा जाहीर केल्यास विद्यार्थी आणि पालकांच्या मनावर परिणाम होईल, असा दावा केला आहे.

तसेच 15 वर्षांचा विद्यार्थी रिषान सरोदे याने अ‍ॅड. असीम सरोदे आणि अ‍ॅड. अजिंक्य उडाने यांच्या मार्फत न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर आज याचिका दाखल केली.