TOD Marathi

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण : NCB ने सिद्धार्थ पिठानीला केली अटक

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 28 मे 2021 – बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एनसीबीने त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. सिद्धार्थला हैदराबाद येथून अटक केली आहे.

सिद्धार्थ पिठानीहा सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र आहे. त्याला मुंबईला ट्रान्झिट रिमांडवर आणले आहे. त्याच्या रिमांडसाठी आज त्याला मुंबईतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. षडयंत्र रचण्यासह एनडीपीएस कायद्याच्या कलम 27, 28 आणि 29 अंतर्गत त्याच्यावर विविध आरोप ठेवले आहेत.

एनसीबीने सिद्धार्थ पिठानी या सुशांतच्या मित्राला अटक केली आहे. मागील वर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानीचे नाव वारंवार समोर येत होतं. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलंय. कारण एनसीबीने सिद्धार्थच्या अटकेची कारवाई केलीय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने सिद्धार्थला हैदराबाद येथून अटक केली आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या घटनेला पुढील महिन्यात वर्ष पूर्ण होईल. मागील वर्षी या घटनेने संपूर्ण बॉलिवूड आणि मनोरंजन विश्व हादरलं होतं. देशातील केंद्रीय संस्थांनी याप्रकरणी चौकशी केली आहे. सध्या या घटनेचा तपास एनसीबीकडे आहे.