TOD Marathi

राज्यसभा निवडणुकीचे सर्व अंदाज फोल ठरले असून अखेर भाजपने आपली खेळी यशस्वी केली आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik won Rajyasabha Election) यांचा राज्यसभा निवडणुकीत विजय झाला. काही अपक्षांसोबत मनसेचंही एकमेव मत हे भाजपकडे गेल्याचे यावरून दिसून आले आहे. दरम्यान, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनसे आमदार यांनी ट्विट करत अभिनंदन केले आहे. तर, दुसरीकडे त्यांनी शिवसेनेला शाब्दीक फटकाही दिला आहे.

‘औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला. सेना लढाईतही हरली व तहात पण हरली’, असं म्हणत राजू पाटील (MNS MLA Raju Patil)  यांनी शिवसेनेला फटकारलं आहे. (MNS criticized Shivsena)

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.

पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे हे विजयी झाले. हा महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे बोलले जातय. भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली आहे