TOD Marathi

औरंगाबाद: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे म्हणत ठाकरेंनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिली आहे त्याच सोबत सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

सध्या बचाव आणि तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा आणि महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सायंकाळी आणि आज सकाळी देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली.

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी, असे निर्देश त्यांनी दिले.