आमचा दसरा कडवट झाला तरी तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; FRP साठी राजू शेट्टी आक्रमक!

Raju Shetty - TOD Marathi

कोल्हापूर: शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेटी आक्रमक झाले आहेत. आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा ईशारा शेट्टींनी सरकारला दिला आहे. राजू शेटी हे ७ ऑक्टोबरपासून ‘जागर एफआरपीचा’ हे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली.

आज पुण्यात एक रकमी एफआरपीसाठी आंदोलन झाले, पुढच्या महिन्यात संपूर्ण राज्यात हे आंदोलन होईल, असे सांगतानाच ते म्हणाले, स्वाभीमानी कोरोना नियमांचे पालन करुन आंदोलन करते, स्वाभिमानी संघटना झोपली आहे, असा गैरसमज कुणीही करु नये असेही शेट्टी यावेळी म्हणाले.

येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. आराधना शक्तीस्थळापासून हे आंदोलन सुरु होणार आहे, असे शेट्टींनी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरुनही त्यांनी सरकारवर निशाण साधला आहे.

Please follow and like us: