TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 31 मे 2021 – कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांनी नियम सर्वाना लागू आहेत, हे कारवाईतून दाखवून दिले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील भाजप आमदार महेश लांडगे यांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याचे आज माध्यमांद्वारे समोर आल्यानंतर, याप्रकरणी पोलीस आता काय कारवाई करतील?

नियम केवळ सर्वसामान्यांना लागू आहेत का? नेते मंडळींना सर्व काही माफ आहे का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडत होते.  मात्र, अखेर पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या या प्रश्नाला केलेल्या कारवाईवरून उत्तर मिळाले आहे.

भोसरी पोलीस ठाण्यामध्ये आमदार महेश लांडगे यांच्यासह एकूण ६० जणांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात जमावबंदीचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

६ जून रोजी आमदार महेश लांडगे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आहे. त्यापूर्वी काल (रविवारी) झालेल्या मांडव सोहळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांसह भंडारा उधळून डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आलाय.

तसेच, यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क हि लावला नव्हता. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या व्यक्तींनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाकडे दुर्लक्ष करत गर्दी करत जल्लोष केला. तसेच, यावेळी वाजंत्री, बैल जोड्यांचे हि आयोजन केले होते.