TOD Marathi

मुंबई : अखेर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला (Vidhan Parishad election vote Count ) सुरुवात झालेली आहे. साधारण दोन तासांपासून मतमोजणी रखडली होती. भाजपच्या दोन मतांवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता, त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया थांबली होती. मात्र आता जवळपास दोन तासांच्या नंतर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लवकरच निकालाचे कल हाती येतील.

भाजपचे (BJP) 5 तर महा विकास आघाडीचे 6 असे एकूण अकरा उमेदवार दहा जागांसाठी रिंगणात आहेत. या 11 पैकी कोण 10 सभागृहात जाणार आणि 1 कोण मागे राहणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. भाजप आणि महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) दोघांनीही आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. आमचे सर्व उमेदवार जिंकून येतील असा विश्‍वासही दोन्ही बाजूंनी दर्शविण्यात आला होता. त्यामुळे आता आमदारांनी कुणाला मतदान केलं, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीप्रमाणे (Rajyasabha election ) विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजप आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Lakshman Jagtap ) आणि मुक्ता टिळक हे आजारी असूनही मतदानासाठी दाखल झाले होते. त्यांनी मतदान करताना अतिरिक्त दोन लोक त्यांच्या सोबत होते असा आक्षेप काँग्रेसच्या वतीने नोंदविण्यात आला होता. 285 आमदारांनी या निवडणुकीत मतदान केले. या सर्व पार्श्‍वभूमीवर आता निकालाचं चित्र काही वेळातच स्पष्ट होणार आहे.