TOD Marathi

तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये 2 कुटूंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दोन घरात जवळपास नऊ मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खळबळ माजली. (Sangli Suicide Case)

मिरज पोलिसांनी (Miraj Police) घटनास्थळी तातडीनं धाव घेऊन अधिक तपासला सुरुवात केली आहे. म्हैसाळ (Mhaisal) येथील माणिक यल्लाप्पा होनमोरे आणि पोपट यल्लपा होनमोरे या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील 9 जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती आहे.

दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तींमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.