TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 1 जून 2021 – पहिल्या लॉकडाऊन प्रमाणे दुसऱ्या लॉकडाऊनचा परिणामही नागरिकांवर झाला आहे. आयसीएमआरचे महानिदेशक डॉ. बलराम भार्गव यांनीही लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे, हे मान्य केलं मात्र, लॉकडाऊन हा मोठ्या काळासाठीचा उपाय नाही, असे सांगत लॉकडाऊन कसा संपवावा? आणि त्याचा पर्याय कसा शोधावा? यासंदर्भात तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, जिथे लॉकडाऊन शिथिल केला जाईल, त्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट मागील सात दिवसांत 5 टक्क्यांहून कमी असावा. त्यासह 60 वर्षांहून अधिक वयाच्या आणि 45 वर्षे वयाच्या त्या लोकांना ज्यांत अन्य कोणताही गंभीर आजार नाहीत त्यांच्यापैकी 70 टक्क्यांहून अधिक लोकांना लस दिलेली असावी. देशात डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण होणार आहे.

लोकांनी लसीकरणाबाबत धीर धरावा. भारत जगातील पाच देशांपैकी एक आहे, जो लस बनवितो. अमेरिकेत जेवढी लस दिली गेली, तेवढी आपल्याकडेही दिली. परंतू आपली लोकसंख्या अमेरिकेच्या चौपट आहे. जुलै, ऑगस्टपर्यंत आपल्याकडे पुरेशी लस असणार आहे, असे ते म्हणाले.