टिओडी मराठी, मुंबई, दि. 26 ऑगस्ट 2021 – केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल झालेत. रुटीन चेकअपसाठी राणे रुग्णालयात गेले आहेत, असे सांगण्यात येत आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वक्तव्य केल्यानंतर राज्यात राजकीय वादळ उठलं होतं. याच दरम्यान राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थांबली होती. ती लवकरच पुन्हा सुरु होणार आहे. उद्या जन आशीर्वाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल. याच पार्श्वभूमीवर रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयामध्ये पोहोचले.
नारायण राणे यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं नाही. राज्यभरात होणाऱ्या या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी हे रुटीन चेकअप करण्यात येत असल्याची माहिती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणार आहे. सिंधुदुर्ग हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेलं कणकवली शहर सज्ज झालंय. नारायण राणे शिवसेना सेना राड्यानंतर दादांचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
Mumbai | Union Minister and BJP leader Narayan Rane is visiting Lilavati Hospital for a routine check-up before resuming his participation in Jan Ashirwad Yatra in the state. He is not admitted at the hospital: Maharashtra BJP vice president, Prasad Lad
— ANI (@ANI) August 26, 2021