TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 26 ऑगस्ट 2021 – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात मंगळवारी राजकीय नाट्य रंगलंय. नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ७ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर दुपारी त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील केली होती.

मात्र, नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मंगळवारच्या घडामोडींवर भाष्य केलं. यावरून महाराष्ट्र राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

यावरून आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी तीव्र शब्दात आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहे त्यांनी कायदा हातात घेऊ नये. त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांबाबत जे विधान केले, ते पूर्णपणे असंसदीय आहे. जर उदयाला कोणीही उठून चुकीच्या भाषेचा वापर करत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानशीलात वाजवेल’ असे म्हटले तर काय होईल?. तर त्या व्यक्तीबद्दल नरेंद्र मोदी सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करेलच ना ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

विरोधी पक्ष म्हणतोय की, हे सुडाचे राजकारण आहे?. मात्र, हे सुडाचे राजकारण कसे असणार?. तुम्ही जर महाराष्ट्र राज्यात कायद्याचे राज्य उलंघन कराल तर तुमच्यावर कायदेशीररित्या कारवाई होणार. असेही ते म्हणाले.