टिओडी मराठी, पुणे, दि. 26 ऑगस्ट 2021 – भाजप नेते तथा केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरले होते. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना-भाजपमध्ये जुंपली होती. असे असताना भाजप नारायण राणे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे दिसून आले आहे. मात्र, भाजप नेते गिरीश बापट यांनी राणे यांना घरचा आहेर दिला आहे.
याबाबत भाजप नेते गिरिश बापट म्हणाले की, राजकीय पक्षामध्ये मतभेद असतात. पण, बोलताना पथ्य पाळलं पाहिजे, त्यात सर्वच पक्षांचा समावेश आहे. मुख्यमंत्री असतील,,नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला काही हरकत नाही. पण, अनेक गोष्टीमध्ये अडचणी दिसतात. मग, त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याचे वक्तव्य केल्यामुळे राज्यातील राजकारण तापले होते.