मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय?
महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत.सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे.
म्हणून जनता गप्प बसणार नाही.कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत.हे पुन्हा सिद्ध झाले.सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ. https://t.co/IDwZgoQ09Q— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2022
सीमाप्रश्न कोणा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. सीमाप्रश्नी सर्वपक्षीय भूमिका घेणे गरजेचे आहे. याआधी याप्रश्नी एक समिती स्थापन झाली होती. त्या समितीत एस एम जोशी, बाळासाहेब ठाकरे, नानासाहेब गोरे, शरद पवार, एन डी पाटील अशा सगळ्याच पक्षाचे लोक होते. त्यामुळे सीमावादाचा प्रश्न हा राजकीय अभिनिवेशाचा प्रश्न होऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांनी या लढ्याचं नेतृत्व करावं आणि आजघडीला शरद पवारांपेक्षा दुसरा वरिष्ठ नेता नाही. शरद पवारांनी याआधी बेळगावात जाऊन आंदोलने केली आहेत. त्यामुळे पवारांच्या सीमाप्रश्नाच्या भूमिकेमागे महाराष्ट्र उभा राहिल, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला.
शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटकआव्हान देत आहे.यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा. कायदा.न्यायालये.तपासयंत्रणा खिशात आहेत असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का?मी तयार आहे.!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2022