TOD Marathi

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असताना राज्य सरकारची पुरती कोंडी झाल्याचे दिसून येत आहे आणि सीमा वादावरून विरोधी पक्षाच्या वतीने राज्य सरकारला चांगलंच घेरण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील सीमा वादावरुन सरकारवर चांगलाच हल्लाबोल केलाय (NCP MLA Rohit Pawar also attacked  the Government  over the border dispute).

वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?

आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू… करू… केंद्राशी बोलू… ही मूळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही!

असं ट्विट करत रोहित पवारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मात्र, हे करत असताना शिंदे-फडणवीस सरकार निर्मितीच्या दरम्यान ज्या पद्धतीने आमदारांना सुरतला पाठवलं होतं तोच दाखला देत पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असा खोचक प्रश्न देखील रोहित पवारांनी विचारला आहे. त्याचबरोबर वैयक्तिक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना जशी कलाकारी दाखवली तशी कलाकारी सीमा प्रश्न महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? असेही रोहित पवारांनी म्हटले.