TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 26 ऑगस्ट 2021 – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना पक्ष यांच्यातला संघर्ष काही संपणार नाही, असे दिसत आहे. नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेला इशारा दिला होता. त्यानंतर आज शिवसेनेने ‘सामना’ दैनिकातून राणेंविरोधातील जुन्या प्रकरणांची चौकशी करण्याचा इशारा दिला आहे.

या दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता नारायण राणे यांना अप्रत्यक्षरित्या टोला हाणला आहे. काही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचाही बंदोबस्त करायचा आहे, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना हाणला आहे.

अजूनही थोडे दिवस थांबायला पाहिजे, कोरोनाचं संकट खरंच गेलं आहे का? पूर्ण गेलं नाही, अजूनही आहे. काय काय तर जुने व्हायरस परत आलेत. ते पण दिसतंय.आणि जुने व्हायरससुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट त्याच्यात आणतायत. तर त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे. त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या जन आशीरव्दा यात्रेवर निशाणा साधला आहे. सगळ्यांना फिरणं आवडतं. काही जणांचे राजकीय पर्यंटन असतं इथून तिथे आणि तिथून इथे. काहीजण प्रवासी असतात, ते वेगवेगळी ठिकाणं बघत असतात. मधल्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली होती. त्यावेळी एक शब्द वापरला होता ‘रिवेंज टुरीझम’. त्यांचं असं म्हणणं होतं की जरा सावधता बाळगा, पर्यटन स्थळावर एवढी गर्दी होत आहे की पुन्हा हे संकट येऊ शकतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.