TOD Marathi

औरंगाबाद :
येत्या 8 जून रोजी औरंगाबादेत (Aurangabad) मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा पार पडणार आहे. अखेर पोलिसांकडून आज या सभेसाठी काही अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून (Shivsena) जय्यत तयारी करण्यात येत आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत स्थापन झाली होती. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. (Uddhav Thackeray Rally Aurangabad)

मुख्यमंत्र्याची ही सभा शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडणार असून, काहीच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा या ठिकाणी पार पडली होती. त्यानंतर याच मैदानावर उद्धव ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं कुणाला लक्ष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून रहिले आहे.

राज्यात येत्या 10 जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच मैदानावर गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली होती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मविआ सरकारवर देखील वक्तव्य केलं होतं, तेव्हा या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सभेत काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.