TOD Marathi

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ (Nivedita Saraf) ही कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी आहेत. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यात १८ वर्ष वयाचे अंतर असले तरी दोघांच्या प्रेमापुढे वयाला काहीच स्थान नसल्याचे लक्षात येते. अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निवेदिता यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

निवेदिता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर अशोक सराफ यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले की, ‘गेल्या जन्मी काही तरी पुण्य केलं होतं नक्कीच म्हणून तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझं भाग्य उजळलं. प्रेमा काय देऊ तुला? भाग्य दिले तू मला’. निवेदिता यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ १९९० साली विवाहबंधनात अडकले होते. त्यावेळी अशोक सराफ ४३ वर्षांचे आणि निवेदिता सराफ २५ वर्षांच्या होत्या. एका नाटकादरम्यान दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘अशी ही बनवाबनवी’ अशा अनेक चित्रपटात एकत्र काम केले. परंतु, ‘धुमधडाका’ या चित्रपटात काम करत असताना दोघांची चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

निवेदिता यांच्याबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘अग्ग बाई सासूबाई’ या मालिकेतील आसावरी या भूमिकेमुळे फारच लोकप्रिय झाल्या. आता एका नव्या भूमिकेद्वारे त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज