TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 4 जुलै 2021 – जर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर एकादशीला पूजेला जाणार असतील तर, मी देखील पूजेला जाणार आहे, हवं तर अडवून दाखवा, असे आव्हान बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी प्रशासनाला दिलं आहे. अभिजित बिचुकले यांनी वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे याचा निषेध केला आहे. आणि आपण वारकऱ्यांसोबत आहे असे सांगितले आहे.

कोरोनामुळे यंदा वारी होणार कि नाही? असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी ठाकरे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे वारीच्या रस्त्यावर पायी जाणाऱ्या बंडातात्या कराडकर आणि वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याचा निषेध बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी नोंदवला आहे. तसेच मी वारकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे सांगितले आहे.

जर, यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर एकादशीला पूजेला जाणार असतील तर, मी देखील पूजेला जाणार आहे, हवं तर अडवून दाखवा, असे आव्हान अभिजित बिचुकले यांनी प्रशासनाला दिलं आहे. राजकीय सभा, मेळावे, निवडणुका घेतल्या जातात, यामुळे कोरोना होत नाही का?. असा प्रश्न बिचुकले यांनी प्रशासनालाच विचारला आहे.

बिचुकले यांनी अनेकवेळा चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. किंवा ते त्या प्रकारची भूमिका व्यक्त करत असतात. त्यांनी अनेक निवडणुका लढविल्या आहेत. यात त्यांना जरी अपयश आलं असलं तरी त्यांनी अनेकवेळा स्वतःला चर्चेत ठेवण्याचं प्रयत्न केला आहे.